Saturday, May 15, 2010
आईचं बाळ
बाळ तुझं लाडोबा

आपण आईच्या कुशीतून जन्म घेतो. हे नजरेत न मावणारं जग लुक लुक डोळ्यांनी पाहत राहतो. आई खूप खूप प्रेम करत असते आपल्यावर. तिच्या मांडीवर खेळायचं, तिच्या हातानं भरवून घ्यायचं, तिच्या कुशीत निजायचं, तिचं बोट धरून पाहिलं पाउल टाकायचं. पाटी नाही, पुस्तक नाही. शाळा नाही, खेळ नाही. सारखं आपलं तिच्या अवतीभवती भिरभिरत रहायचं. ती सुद्धा आपली आठवण आली कि मधेच वेळ काढणार. कधी येवून आपली पापी घेणार. कधी हळूच आपल्या गुबगुबीत गालाच्या पाकळ्या ओढणार. कधी कधी तिला आपल्यावर माया करायचं इतकं भरतं येत कि ती सारं काम आहे तसंच टाकून देते आणि पटकन येवून आपल्याला पदराखाली घेते. आपणही मग मजेत कृष्ण होवून ते अमृतपान करत राहतो.
अशी दोन चार वर्ष सुखात जातात. कुणास ठावूक कुठून पण घरात पुन्हा एक छोटसं बाळ येतं. आपल्याहूनही छोटसं. गोरंगोरंपान, इवल्या इवल्या मुठी असणार, फुल उमलाव तसं खुदकन हसणारं. मस्त वाटत आपल्याला सुरवातीला. त्याच्याशी खेळताना, त्याची पापी घेताना, त्याच्याशी बोबडं बोलताना खूप खूप आनंद होतो. आपण त्याची मोठ्ठी ताई आहोत म्हणून अभिमानही वाटतो.
कधी कधी त्याचं काय बिनसतं कुणास ठावूक. खुदकन हसायचं सोडून ते मधेच सप्तसूर लावतं. मग आपण रागावतोही त्याला. ते आणखीनच गळा काढत.
आपण त्याला असे रागावतो. आणि आई स्वयंपाक घरातून येवू धपक्कन पाठीत एक धपाटा ठेवून देते आपल्या. खरंतर खूप जोरात मारलेलं नसतं आईनं आपल्याला. पण तरी आपण सूर काढून रडायला लागतो. डोळे भरून येतात. आभाळासारखे बरसू लागतात. आपण असे कुण्णी कुण्णी नसल्यासारखे रडत असताना आई आपल्याला जवळही घेत नाही. उलट त्या इटुकल्या पिटुकल्यालाच पदराखाली घेते. झालं हिरोचा सूर लगेच बंद. आपण मात्र रडतोच आहोत कोपऱ्यात बसून.
आईचं हे असं वागणं पाहून, " आई मी मोठ्ठी झाले म्हणून माझं काही चुकलं का गं ? अगं छोट्या बाळाला जशी तुझ्या मायेची गरज आहे तशी मला सुद्धा तुझ्या मायेची खूप गरज असते गं. तेव्हा तू बाळाचे लाड कर पण कधी कधी माझेही थोडे लाड करत जा ना." अशी आईला लाडी गोडी लावणारी हि मुलगी.
Tuesday, May 11, 2010
राक्षसपूरचा राक्षस
आवडेल म्हणताय ! खूप छान.
मित्रांनो तुम्ही जसे मित्र आहात ना अक्कलरावाचे तसेच आणखी खूप मित्र आहेत अक्कलरावाचे. परवा तुम्हाला भेटलेला झाडासाठी टोपी शिवण्याच स्वप्न पहाणारा छोटा मुलगा जसा मित्र आहे ना अक्कलरावाचा तसाच राक्षसपूर नावाच्या गावातील एक राक्षस हि मित्र आहे अक्कलरावाचा.
अरे ! असे घाबरू नका राक्षस म्हणालं कि लगेच. हा राक्षस काही गोष्टीतल्या नेहमीच्या राक्षससारखा आडदांड नाही. राक्षसपूरमधला हा राक्षस खूप प्रेमळ आहे. त्याच्या अंगावर केस नाहीत. डोक्यावर शिंग नाहीत. त्याचे डोळे आगीचे लाल गोळे नाहीत आणि त्याच्या तोंडात लांबलचक सुळेही नाहीत. त्याला गाडीभर खायला तर लागत नाहीच पण पाणी किती लागतं प्यायला तर फक्त चमचाभर. आहे कि नाही मजेशीर राक्षस .
हा राक्षस तुम्हाला त्याच्याजवळ असलेल्या चोकलेट मधलं अर्ध चोकलेट तर देतोच पण तुमची गोड पापीही घेतो.
तुम्हीही भेटा त्याला आणि त्यांनी पापी घेतली कि कसं वाटलं ते ही सांगा.
Sunday, May 9, 2010
मातृदिन. ९ मे
"चला चला चला. खेळत काय बसलात ? इकडे या सगळे.""काय म्हणालात. आम्हाला आमचा खेळ सोडून एवढ्या तातडीने का बोलावलत ?"
"सांगतो. सांगतो. आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला ?"
" नाही ना ? सहाजिकच आहे. लहान आहात तुम्ही अजून. पण तरही हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. कारण तो एक आपल्या संस्काराचा भाग आहे. म्हणून तर तुम्हाला एवढ्या तातडीने बोलावलंय."
"हं ! तर मुलानो आज आहे मातृदिन. ९ मे . लक्षात ठेवाल ना यापुढे ! "
" काय म्हणालात ? मातृदिन म्हणजे काय असतं ?"
"मुलांनो. मातृदिन म्हणजे आईची थोरवी गाण्याचा दिवस. आईच्या मोठेपणाच स्मरण करण्याचा दिवस. आई आपल्यासाठी राबते. झिजते. हाडाची काड करते. पण आपण कधी तिचे आभार सुद्धा मानत नाही. तिच्यावर कधी सुखाचे चार शब्द उधळत नाही. जगभरातल्या प्रत्येक मुलांना आपल्या आईविषयी कृतन्यता व्यक्त करावी म्हणून जगभरात आज हा दिवस साजरा केला
जातो. "
"म्हणजे काय करायच अक्कलराव ? असं अजिबात विचारू नका. "
"करायचं म्हणलं तर खूप काही करता येण्यासारखं आहे. खूप काही करू नका. फक्त आज आईला त्रास द्यायचा नाही. म्हणजे इतर दिवशी द्यायचा असं नव्हे. पण आज मात्र तिला थोडाही त्रास द्यायचा नाही. तिच्याजवळ कुठलाही हट्ट करायचा नाही. तिनं सांगितलेलं प्रत्येक काम ऐकायचं आणि तिची गोड पापी घेवून तिचं असंच अखंड प्रेम लाभावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची."
"मुलांनो आईच्या वेदना, तिचे कष्ट, तिचं सोसणं, तिनं आपल्यासाठी केलेली धडपड यापैकी कश्शा कश्शाची जाणीव नसते आपल्याला. या साऱ्याची जाणीव ठेवण्याचा हा दिवस."
"आई जशी आपल्याला असते तशीच पाखरांना असते........वासरांना असते. वाघाच्या बछडयाला असते आणि गाढवाच्या गाधडयालाही असते."
"आकाशातून आपल्या पिलांवर झडप घालणाऱ्या बलाढ्य घारीवर कोंबडीसारखा सामान्य जीव धावून जातो. कारण ती आई असते. बस्स ! एवढंच लक्षात ठेवा आणि यापुढे आईला त्रास देणं बंद करा ."
"कराल ना एवढ ?"
"सगळेच हो म्हणाले. चला ! मला आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतो आहे. अरे पण असे पळताय कुठे सगळे ?"
"आईच्या कुशीत शिरायला ? ठीक आहे. ठीक आहे. चला मी हि निघालो माझ्या आईच्या कुशीत शिरायला."
Friday, May 7, 2010
चित्र आणि खरेपणा
चित्र काढायला आवडतं ना तुम्हाला ?
Wednesday, May 5, 2010
शाळेचा रिझल्ट
काय मुलांनो, परवाची गोष्ट वाचलीत ना ?आणि ढमप्या तुला मार्क कमी पडले म्हणून तू काही लगेच परवाच्या गोष्टीतल्या कोकिळे सारखं रडत बसायला नको काही. मार्क आणि बुद्धिमत्ता यांचा एकमेकांशी संबंध आहे हे जरी खरं असलं तरी, कमी मार्क म्हणजे ढ गोळा असं नव्हे काही. तू गेल्यावर्षी खूप खेळला असशील. हो कि नाही ?
पुढच्या वर्षी सांगशील ," अक्कलराव मलासुद्धा ८० टक्के मार्क मिळाले. " Tuesday, May 4, 2010
प्राण्यांच्या शाळेचा निकाल.

आपल्या शहरात मुला मुलींच्या शाळा असतात. तशीच जंगलातही प्राण्यांची एक शाळा होती. त्यांची शाळा वाडाच्या एका मोठ्ठ्या झाडाखाली भरायची. सात माणसांच्या कवेत मावणार नाही इतकं ते झाड मोठं होतं. सारे प्राणी त्या झाडाखाली जमायचे. मन लावून शिकायचे. गुरुजींचा नाव होतं पोपटराव. उंट, हत्ती, घोडे, गाढव, चिमण्या, कावळे, कोकीळ, मैना, लांडगे, कोल्हे सारे सारे त्या शाळेत जायचे. मन लावून अभ्यास करायचे. त्यांची लेखी परिक्षाही व्हायची. आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा परीक्षेचा निकालही लागायचा.
मुलांनो कालच त्या सार्यांच्या परीक्षेचा निकाल लागला. सगळ्यांचे आई बाबा सोबत होते. सगळे पास झाले.............नापास झाली ती फक्त कोकिळा.
सगळे पास झाले म्हणून कोकिळेला फार आंनंद झाला. पण आपण नापास झालो याचंही फार वाईट वाटलं. तिचं उडणं - बागडणं, हसणं - गाणं सारं बंद झालं
दोन दिवस झाले. चार दिवस झाले. पण जंगलात कुठेही कोकिळेचा आवाज ऐकू येईना. पास झालेल्या साऱ्यांची खूप दंगा - मस्ती चाललेली. आपण सारे पास झालोत या आनंद सोहोळ्यात सारे हरवून गेलेले. पण हळू हळू त्यांच्या लक्षात आला कि," अरे आपण सारे मस्त मजेत दंगा मस्ती करतो आहोत. पण कोकिळेचा आवाज कोठूनही ऐकू येत नाही. आपण खेळतो आहोत पण आपल्याला तिच्या गाण्याची संगत नाही."सहजिकच साऱ्यांना खूप खूप चुकल्या चुकल्या सारखा वाटत होतं.
चौथ्या दिवशी साऱ्यांनी आपला खेळ दिला सोडून आणि सारे गेले कोकिळेच्या घरी. तर कोकिळा अजूनही रडत बसलेली. रडून रडून तिचे डोळे लाल झालेले. चेहरा कोमेजलेला. साऱ्यांना खूप वाईट वाटलेलं तिची अशी अवस्था पाहून. प्रत्येकजण आपापल्यापरीनं तिची समजूत काढू लागला.
मैना म्हणाली," ये रडूबाई, असं रडून काय होणार ? चलं पुढच्या वर्षी खूप अभ्यास कर मग बघ तू नक्की पास होशील."
माकड म्हणालं," हे गानतपस्विनी, अशी रडू नकोस. हे बघ पुढच्या वर्षी मी मदत करीन तुला अभ्यासात. पण आता रडणं बंद कर पाहू."
चिवचिव चिवचिव करत चिमणी म्हणाली ," ओ आत्याबाई. पुरे आता. दोघी मिळून खूप अभ्यास करू पुढच्या वर्षी. मग बघू तुम्ही कशा नापास होतंय ते."
साऱ्यांचा एकाच दंगा चाललेला. शेवटी पंखामध्ये मान खुपसून रडत बसलेल्या कोकिळेला मान वर करावीच लागली. कसे बसे डोळे पुसत हमसून हमसून ती म्हणाली," अरे माझ्या मित्रांनो कसं सांगू तुम्हाला. अरे, मी खंरच खूप अभ्यास करते रे. पण गणित, इंग्रजी या विषयातलं मला खंरच काही काळात नाही रे. खंरच मी कध्धी कध्धी पास होणार नाही."
कोकिळेच म्हणणं साऱ्यांना पटत होतं. ती खरच खूप खूप अभ्यास करायची हेही साऱ्यांना माहित होतं. पण तिचं रडू तर थांबायलाच हवं होतं. रडून रडू तिचा गळा बसला तर तिचं गाणं आपल्याला पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही याची जाणीव साऱ्यांना होती. म्हणून पुन्हा पुन्हा सारे तिला समजावत राहिले. शेती साऱ्यांच्या समाधानासाठी कोकिलेन तिचं रडू आवरलं. अंधार पडू लागला होतं. हळू हळू सारे आपापल्या घरट्याकडे परतू लागले. पण जाता जाता साऱ्यांनी ठरवलं यातून काही तरी मार्ग काढायलाच हवा. पुढच्या वर्षी कोकिळा पास व्हायलाच हवी.
दोन दिवस साऱ्यांनी खूप खल केला. पण कोणाचंही डोकं चालेना. पण ठरल्याप्रमाणे सारे दोन दिवसांनी शाळेत जमले. सिंह महाराज म्हणाले," हं ! सुचलाय का कोणाला काही मार्ग ?"
पण कोणीच काही बोलेना. सारे पडेल चेहऱ्याने बसलेले.गप........ गप. सारं काही शांत.
"महाराज माझ्याकडे आहे मार्ग " सगळ्यांच्या मागून आवाज आला. "अरे ! हा तर गाढवाचा आवाज ." असं म्हणत साऱ्यांनी मागे वळून पाहिलं. गाढवाला सारेच बुद्धू समजायचे . साहजिकच साऱ्यांनी त्याची खूप टर उडवली.
"अरे सर्वात ढ गोळा तू . आणि तू काय मार्ग दाखवणार ?" छद्मी हसत कोल्हा म्हणाला.
" खामोश ! " जंगलचा राजा सिंह गरजला." कोल्हेमामा, आपण प्राणी आहोत. दुसऱ्याला स्वतःपेक्षा कमी लेखायला आपण काही माणसं नाही आहोत."
"गाढवदादा, सांगा बरं तुमचा विचार." खजील झालेल्या गाढवाकडे पाहून सिंह म्हणाला.
सगळ्यांनीच टिंगल केल्यामुळे गाढव थोड बुजलच होतं. आपला विचार सारयांपुढे मांडवा कि मांडू नये या विचारात पडलं होतं. जंगलच्या राजानं गाढवाची हि द्विधा मनस्थिती ओळखली. गाढवाला धीर देत ते म्हणाले," गाढवादादा असे घाबरू नका. मोकळ्या मानाने सांगा तुम्हाला काय वाटत ते."
" महाराज," गाढव धीर करून बोलू लागलं. " कसं आहे पहा. आपण सारेच थोडे बहुत माणसाळंलेले. तुमचेसुद्धा काही भाईबंद सर्कशीत, प्राणी संग्रहालयात असतात. माकड भाऊ काय, घोडेराव काय, मी काय, चिवूताई काय आम्हा साऱ्यांची माणसांच्या कडेकडेने उठबस असते. म्हणून आम्हा साऱ्यांना गणित, इतिहास, भूगोल या साऱ्या विषयातल थोडं बहुत कळतं आणि म्हणून आम्ही सारे पास होतो. पण
गाढवाच्या या विनोदावर सारेच पोटधरून हसले.



