Saturday, February 27, 2010

अक्कलपूरचे अक्कलराव



















मुलांनो अक्कालराव कसे आहेत पहा बरं -
अक्कलपुरचे अक्कालराव
छाती काढून खात्तात भाव;
जर विचारला त्यांना नाव
लक्षात नाही म्हणतात राव.

अक्कालराव शाळेत जातात
वर्गात खुशाल झोपा घेतात;
मास्तरांच्या छड्या खाऊन
वरती पुन्हा ढेकर देतात.

वर्गामधे अक्कालराव
सगळयात मागे बसतात;
विनोद झाल्यानंतर ते
तासाभराने हसतात.

झोपताना उशाला ते
सारी पुस्तके घेतात;
उठ्ल्यावरती म्हणतात गेली
रात्र अभ्यासात.
अक्कालराव अजूनही फार मजेदार आहेत पण ते उद्या.

आता मला आँफिसला निघायला हवं.
पुन्हा भेटुया !!!!!!!!!!

छोट्या मित्रानो
















छोट्या मित्रांनो,
गोड पापा,
खरंतर मला मराठीतच लिहायचय होत. पण काय करू ? यथं मराठी भाषाच लिहिता येत नाही. तुम्ही समजावून घ्याल ना ? तुमच्यासाठी रोज खुप लिहिणार आहे. वाचाल ना ? टिव्ही पहाण्यापेक्षा वाचत राहणं खुप चांगलं. मी जे लिहिन ते तुम्हाला आवडलं तर मला नक्की कळवा पण नाही आवडल तरी कळवा. कारण तुम्हाला आवडलं तर मला लिहियला हुरूप येईल आणि नाही आवडलं तर मी अधिक चांगलं लिहीयचा प्रयत्न करीन.
तुमच्यासाठी या पानावर मी आज पहिल्यांदा लिहितोय, म्हणून थांबतोय पण तुम्हाला खाऊ दिल्याशिवाय जाणार नाही. आवडेल ना तुम्हाला शब्दांचा खाऊ ? घ्या तर मग -
मुलं म्हणजे देवा घरची फुलं
गुलाबाची पाकळी , मन मोकळी
मुलं म्हणजे , देवा घराचा दिवा
अंगनात लावा,
मुलांनी असावं, झऱ्यासारखं निर्मळ
डोंगर दर्यातुन, वहावं खळखळ

उदया होळी. आपल्या मनात जे जे वाईट ते ते सारं होळीत अर्पण करा आणि आनंदान बोंब ठोका. मला सांगाल ना कोणी कशी बोंब ठोकली आणि कशी मजा आली ते ?
आज इथंच थांबतो , पुन्हा भेटू -


तुमचा
अक्कलराव