Tuesday, April 27, 2010

अथक परिश्रम


मागे एकदा मंगेश तेंडूलकरांच्या विषयी मी लिहिलं होतं. तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं कि,"त्यांनी चित्रकलेचं कोणतही शिक्षण घेतलं नाही. तरी आज ते एक आघाडीचे व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जातात.
मला सुद्धा दोन महिन्यापूर्वी या ब्लॉग विषयी काहीच माहित नव्हतं. त्यातलं कि ठो कळत नव्हतं. पण आज दोन महिन्यानंतर मला बर वाटेल असं काम झालय.
दोन महिन्यापासून तुम्हाला रुचेल असं लिहीयचा मनापासून प्रयत्न करतोय. पण माझ्या ब्लॉगचं
पान मात्र मला देखणं वाटत नव्ह्तं.
बाळ दिसायला छान असलं कि त्याच्याकडे पहावसं वाटत. त्याच्याशी खूप खूप
खेळावस वाटतं. पण त्याच्या नाकाला खूप शेंबूड असेल तर त्याची पापी काही घ्यावीशी वाटत नाही. तसंच माझ्या ब्लॉगचं पान कालपर्यंत काहीसं शेंबड होतं.
म्हणून शनिवारची एक मेची आणि आठवड्याची आजची अशा जोडून आलेल्या दोन्ही सुट्ट्या तुम्ही नेहमी पाहणार असलेलं हे पान
देखणं करण्यात घालवल्या. आणि आज संध्याकाळी मना सारख काम झालं तेव्हा सुटकेचा श्वास घेतला.
हे सारं तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच मुलांनो कि," अथक परिश्रामाशिवाय काहीच शक्य नसता आणि अथक परिश्रम केले तर काहीच अशक्य नसतंहे तुम्हाला कळावं.
मग कराल ना अथक परिश्रम ?
छे ! मी प्रश्न कसला विचारतोय. मला माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा खूप खूप कष्टाळू आहात ते.
हो आणि तुमचा रिझल्ट लागेलच ना एक - दोन दिवसात. त्यासाठी भेटेनच मी तुम्हाला एक दोन दिवसात.
पेढे घेवून या हं.
एक सांगायलाच हवं. आपल्या ब्लॉगच्या एक जाहिरात आहे. ती आहे जगभरातल्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठीकाम करणाऱ्या एका संस्थेची. तुमच्या खाऊतले थोडे थोडे पैसे साठवा आणि शक्य झालं तर त्या संस्थेला नक्कीमदत करा.

Sunday, April 25, 2010

माझ्या मामाची रंगीत गाडी हो




राग गेलाय ना तुमचा ?
मग ठीक आहे.
मला माहिती आहे आता तुम्ही सारे कुठे कुठे गावाला गेला असाल. कुणी मामाकडे, कुणी आत्त्याकडे, कुणी आजोळी तर कुणी आणखी कुठे. खूप खूप मजा करत असाल तिथे. मामाचं शेत असेल तर मग आणखिनच मजा येत असेल. तिथे ओढ असेल, मोटा उरल्या नाहीत आता कुठे बटन दाबलकी पाणी फेकणारी मोटार असेल, विहरीच पाणी पिकापर्यंत वाहून नेणारा पाट असेल, त्या पाटात पंख बुडवून अंघोळ करणारी पाखरं असतील, दुपारच्या रणरणत्या उन्हात आंब्याची गार सावली असेल, गाई - गुरं, शेळ्या - मेंढ्या असतील. रात्रीच्या शुभ्र चांदण्यात वाड्याच्या अंधारात टाकलेला घोंगड असेल आणि त्या घोंगड्यावर आकाशातल्या चांदण्या मोजत लोळणारे तुम्ही असाल.
तुम्हाला ते गाणं आठवतंय -

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो,

कशी दौडत
दौडत येई हो
मला आजोळी घेवून जी हो

तुम्ही म्हणाल अक्कलराव हे काय चालवलय तुम्ही ? मोट काय ? पाट काय ? घोंगड काय ? अहो, आम्ही फक्त टि व्ही पाहतो, विडीओ गेम खेळतो, कॉम्पुटरवर एकेक गेम खेळताना तर फार मजा येते. तुम्हाला यातलं काही माहिती आहे का अक्कलराव ? काय गेम असतात एकेक. रेसिंग काय, फायटिंग काय फार फार धम्माल येते.
मुलांनो अशा बैठ्या आयुष्यात मजा वाटते तुम्हाला. अरे हे तर तुमचं खेळण्याचा, बागडण्याच, हुंदडण्याच , आकाशात पाखरांसारखी मुक्त भरारी घेण्याचा वय. तुम्ही असा एका जागी बसून चालेल. अरे तुम्ही तर उद्याचं स्वप्नं आहात. तुम्ही तर उद्याचं भविष्य आहात. तुम्ही असा एका जागी बसून नाही चालणार. तुम्ही खेळलं पाहिजे, फिरलं पाहिजे, खूप खूप वाचलं पाहिजे.
अर्थात यात तुमचं काही चुकत नाही म्हणा , यात चुकता आमचाच. मोठ्या माणसांचा. काय आहे कि आता आई बाबा दोघीही नौकरी करत असतात. मग कुणी कुणाकडे जायला आणि यायला वेळ आहे कुणाला. सारे आपले चार भिंतींचे गुलाम झालेले.

पण मी जातो हो मुलांना घेवून गावी. खुपदा नाही पण निदान वर्षातून एकदा तरी. तेव्हा आमच्या जयूरानीला ( खरा राजा हा ! ) पडलेले प्रश्न फार मजेशीर आहेत.
बाबा एवढा
ओझं घेवून चालताना बैलांच्या पायांना त्रास नाही का हो होत ?
होतो ना. - मी.
मग त्यांच्यासाठी कुणी बूट का शिवत नाही ?
मी निरुत्तर
आमची बैलगाडी वाड्याहून निघाली. मी खरा तर बैलांला कोणतीच दिशा देत नव्हतो पण तरीही आमची गाडी बरोबर आमच्या शेताकडेच चालली होती. याचाही आमच्या चिरनजीवांना आश्चर्य वाटत होता.
बाबा ते कसे काय बरोबर आपल्या शेताकडेच चालले आहेत.
अरे रस्ता पाठ झाला आहे त्यांला- मी
आपलं घर, आपलं शेत, आपली माणसं हि आपुलकीची भावना जनावरांच्या मनातही असते. पण आपण माणसं मात्र या भावनेला पारखे होत चाललो आहोत. यातून आपण बाहेर पडायलाच हवं.
आपल्यातल्या आपुलकीच नातं अधिक पक्कं करायला हवं.
मग चला तर टि व्ही समोरून उठा. निघा मामाच्या गावाला. आणि आल्या नंतर सांगा मला तिथ तुम्ही काय काय गमती जमती केल्या ते.


Friday, April 23, 2010

ज्वालामुखीच रौद्र रूप

१) लोखंडाचा लालबुंद रस वहावा तसा डोंगर माथ्यावरून वहाणारा हा ज्वालामुखीचा रस
२ ) हाच तो आभाळात शेकडो किलोमीटर लांब आणि हजारो फुट उंचीवर पसरलेला धूर
३ ) परिसरातले बर्फाचे डोंगरही ज्वालामुखीच्या उष्णतेने वितळू लागले
४ ) जमिनीपासून आभाळापर्यंत हा धूर पसरला होता. अशाच धुरातून चाललेली हि कार
५ ) जमिनीचं पोट फाडून उंच उसळी घेणारा ज्वालामुखी

मुलांनो ईश्वर आहे कि नाही जगात या विषयी अनेकांची अनेक मत आहेत. ईश्वराचं अस्तित्व नाकारणारयांचा वर्गही खूप मोठा आहे. पण ज्वालामुखी, स्तुनामी, भूकंप यासारख्या घटना पहिल्या कि ईश्वराचा अस्तित्व नाकारता येत नाही. अगदी परवा युरोपात जमिनीचा पोट फाडून बाहेर आलेला ' एयाजाफाजाल्लोकुल ' ज्वालामुखीच रौद्र रूप पाहिलं कि ईश्वराच अस्तित्व मान्य करावाच लागतं. यासाऱ्या घटनेचं खूप पृथकरण आपण करतो त्याची कारण मिमांसा शोधून काढतो, पण आपल्या हाताततेवढंच आहे. अशा घटना आपल्या काबूत ठेवायला आपल्याला कधी जमेल ?
ज्वालामुखी म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. त्याची व्याख्या तुम्हाला तोंडपाठ असेल. पण तो कितीभयानक असतो याची जाणीव नसेल. म्हणूनच हे फोटो तुम्हाला पाठवतोय. तुम्हाला भीती वाटावी मानून नाही तर तुम्हाला ज्वालामुखीची अधिक जवळून ओळख व्हावी म्हणून.

त्याच्या भयानकपणाच्या खुणा -

१) त्याच्यातून निघालेला धूर आभाळात २४००० फुट उंच गेला होता.

२)हा धूर आभाळात तशी २० ते ८० मैल या वेगाने वहात होता.
3) त्याच्यातून निघलेल्या उष्णतेने भोवतालच्या परिसरातले बर्फाचे डोंगर वितळले
.
४) या वितळलेल्या बर्फामुळे परिसरातल्या अनेक नद्यांना पूर येऊन त्यांच्यावरचे पूल पाण्याखाली गेले.
५) विमानसेवा बंद करावी लागली.
६) या धुरामुळे त्या परिसरातल्या लोकांला काही महिने सूर्यदर्शन होणार नाही।

मग मुलांनो पाहिलात न ज्वालामुखी कसा असतो ते. ईश्वराच अस्तित्व स्विकारायचं कि नाकारयाच हाज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण अजून लहान आहोत त्यामुळे आपण आपलं नम्र असावं बस्स !
तुमचा
अक्कलराव

Thursday, April 22, 2010

झाडासाठी टोपी.........




















मित्रांनो
,
खूप दिवस झाले तुमची परीक्षा संपून पण मी तुम्हाला भेटलोच नाही. रागावलात ना माझ्यावर? सॉरी. काय हे, अजूनही राग जात नाही ? ठीक आहे शिक्षा करा मला.
काय करू ? कान धरू का ? उठाबशा काढू का ? कि कोंबडा होऊ ?

काय, म्हणालात कोंबडा होऊ ?

ठीक आहे कोंबडा होतो.

आवाजही काढू .

ठीक आहे.

कुकु s s s चुकू

काय मस्त हसलात सगळे

हा तर गेल्या महिन्यात तुमच्यासाठी लिहिलेलं पत्र आत्ताच पेटीत टाकलं आणि पुन्हा लिहियला बसलो.

हो ! आधी पेपर कसे गेले सांगा. सगळ्यानला सोप्पे गेले. व्वा ! मग आता काय मजा करताय ? काय, सुट्टीअसूनही मजा येत नाही. खूप उन असतं म्हणून कोणी घराबाहेरच जावू देत नाही. बाहेर गेलं तरी फक्त पाण्यातपोहवास वाटत, नाहीतर झाडाखाली बसावसं वाटत.

झाडाखाली बसल्यानंतर खूप गार वाटत नाही ! पण आपल्याला अशी गार सावली देणाऱ्या झाडाला उन्हाचा कितीत्रास होत असेल याचा कधी विचार केलात ? नाही ना ? हो नाहीच करत आपण कधी असा दुसऱ्याला होणाऱ्यात्रासाचा विचार. आपल्याला सुख देताना दुसऱ्याला किती त्रास होत असेल याचा विचारही नाही शिवत आपल्यामनाला. अगदी आपले हट्ट पुरवताना आपले आई बाबा किती मेटाकुटीला येत असतील हे सुद्धा समजून घेत नाहीआपण.

पण, या कवितेतला मुलगा अक्कालरावाचा मित्र आहे. त्याला मात्र दुसऱ्याची खूप द्या येते. दिवसभर उन्हात उभंराहून आपल्याला सावली देणाऱ्या झाडासाठी एखादी टोपी शिवावी असं त्याला वाटतं. पण अशी टोपी शिवणाराशिंपी कुठे मिळणार ? असा प्रश्नही त्याला पडलाय. म्हणूनच तुम्हाला अजूनही झाडाच्या डोक्यावर टोप्या दिसतनाहीत.

अक्कलराव आणि हा छोटू अजूनही अशी टोपी शिवणाऱ्या शिंप्याच्या शोधात आहेत. तुम्हाला अशी, एवढी मोठ्ठीटोपी शिवणारा शिंपी कुठे भेटला तर अक्कालरावाला नक्की कळवा.