तुमची शाळा सुरु झालीय. अभ्यास मागे लागलाय. चाचणी परीक्षा जवळ आलीय. या सार्याची मला जाणीव आहे. म्हणूनच अलीकडे तुमच्या साठी लिहाना थोडा कमी केल्या. पण बंद नाही हा केल्या. आणि तुमच्यासाठी लिहिणं मी बंद तरी कसा करू शकेन. मलाच मुळात तुम्हाला भेटल्या शिवाय करमत नाही.
एका गोष्टीचा मात्र मला फ्हार फ्हार वाईट वाटत. मी तुमच्यासाठी अगदी मनापासून लिहायचा प्रयत्न करतोय पण तुमच्या प्रतिक्रिया मात्र मला वाचायला मिळत नाहीत. त्यामुळं सहाजिकच तुम्हाला माझा ब्लोग किती आवडतोय ते कळत नाही.
आता पावसाला सुरु झालाय. पाऊस येतो. आपल्याला चिंब करतो. मातीला भिजवतो. काय जादू असते या पावसात काही कळत नाही. पण मातीला हिरवा रंग चढतो. पक्षांचे मंजुळ आवाज येवू लागतात. दूर दूर डोंगराच्या कुशीत फिरून यावंसं वाटतं.
तुम्ही परवा माझ्या ‘ एक होतं वांग ’ या कवितेतल्या वांग्याची गंमत वाचली असेल. तसाच हा पाऊसही.
तुम्ही लपाछपी खेळताना तुमच्या मित्रांसोबत. तसाच हा पाऊसही त्याच्या तुमच्या सारख्याच काही मित्रांसोबत लपाछपी खेळतोय. लपाछपी खेळता ल्ख्र्लता तो लपायला चक्क डोंराच्या पलीकडे गेलाय. आणि डोंगराआड लपून बसलाय.
मग तुमचा मित्र त्याला शोधत डोंगराच्या पलीकडे गेला. त्यांना पावसाला एक जोरदार धप्प दिला. आणि मग काय गंमत झाली ती पहा या कवितेत –
एक होता पाऊस
त्याला बरसण्याची हौस
रिमझिमत याचा
मला कुशीत घ्यायचा.
लपाछपी खेळताना
डोंगराआड लपायचा
वीज होवून डोंगरा आडून
मला लपून पहायचा
डोंगरदरयात जायचो
त्याच्या हळूच जावून
जोरात धप्पा दयायचो
मग तो पुन्हा एकदा
सर होवून यायचा
गोड गोड गार गर
खिसा भरून दयायचा
मी मग त्याला एक
गोड पापा दयायचो
त्याचा हातात हात घालून
खुशाल पाऊस व्हायचो