काय मित्रांनो,
कशी धमाल केलीत काल ? होळी पेटवताना तिच्यात तुम्ही गवऱ्या, लाकडं, एरंड्याची फांदी असं खुप काही टाकलं असेल. होळीच्या कुशीत ठेवलेल्या बारक्या काड्या, मुठभर गवत आधी पेटवलं असेल. मग हळु हळु होळी चहुअंगानं पेटली असेल. तिच्या भोवती गोल फिरत तुम्ही कंटाळा येईपर्यंत बोंब ठोकली असेल. आई बाबा रागवेपर्यंत टिमक्या वाजवल्या असतील.
होळी रे होळी पुरानाची पोळी
बामन मेला संध्याकाळी
असं म्हणत धमाल दंगा केला असेल. आमच्या लहानपणी आम्हीही असंच म्हणायचो. पठित धपाटे बसेपर्यंत दंगा करायचो. पण आता कळतंय हे काही बरं नाहीं. होळीच्या शुभ दिवशी आपण असं कुणाच मरण चिंताव हे काही खरं नाहीं. त्या पेक्षा आपण –
होळी रे होळी पुरानाची पोळी
होळी पेटली संध्याकाळी
होळी पेटली अशी झकास
तिला पाहता ठंडी पळाली
नैवेद्य होळीला पूरणपोळी
तिची राख लावु भाळी
पुढ्याच्या वर्षी पुन्हा येऊ दे
पुन्हा येऊ दे लवकर होळी
भारतीय सणांचा कोणताही दिवस कसा झकास असतो. वातावरण भारून जातं. सगळीकडे उत्साह पसरतो. घरातल्या बायकांपासुन पुरुषांपर्यंत सर्वांचीच लगबग सुरु असते. या सगळ्या धांदलित, “अभ्यासाला बस रे मेल्या” असं म्ह्नणत कोणी तुमचं बखोट धरत नाहीं. तेव्हा तर तुम्हाला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सन आणि उत्सव असावेत असा वाटंत. खरा की नाही ?
“नाही म्हणताय.”
“कसं शक्य आहे ? अरे आमच्या लहानपणी आम्हाला सुध्दा असंच वाटायचं. फक्त सन असावेत. रोज सुट्टी असावी. ” जसं आम्हाला वाटायचा तसं तुम्हालाही वाटणारचना. लहानपण असच असत. जसं आमचं तसाच तुमचंही."
आता कसे गालातल्या गालात हसलात ? पटला ना मी म्हणालो ते ?
लिहिता लिहिता मधेच उठलो. खाली जाऊन सोसायटित पेटवलेल्या पेटवलेल्या होळीला नमस्कार केला. “ तुम्ही केलात ना नमस्कार होळीला ? ”
“केलात. बरं काय मागितलंत तिला ? ”
“अरे हे काय ! सारेच गप्प. काही मागितलंच नाहीत का तिला ? नुसता नमस्कारंच केलात का ?" “का नाहीं मागितल काही? तिच्या समोर ओंजळ करायचा अवकाश. ती तुम्हाला भरभरुन देईल.”
“ काय म्हणालात ? होळी काय देणार आपल्याला ? ते काय देव आहे का? ”
"होय! होळी ही देवताच आहे. अग्नि देवता. आपण होळी पेटवून तिची पूजा करतो ती एका अर्थी अग्निदेवतेचीच पूजा असते."
“काय? मी काय मागीतलत ?”
मी नमस्कार केला होळीला आणि तिला म्हणालो, “आई माझ्यात जे जे वाईट ते ते सारं तुझ्या ओटित घे अणि तुझं तेज मला दे"
आमच्या लहानपणी खुप मोठ्ठी होळी पेटावली जायची. इतकी की चार चार दिवस ती धुमसत असायची.दुसऱ्या दिवशी माझ्या आईसह शेजारपाजारच्या बायका त्या होळीच्या धगीवर पाणी तापवायच्या. असं म्हणतात की होळीच्या निखार्यांवर तापवलेल्या पाण्याने अंघोळ केली की सारे आजार बरे होतात. हे खरं की खोटं ते नाहीं सांगता यायचं मला, पण अशी मोठ्ठी होळी पेटवणं चुकिचंच. कारण अशा मोठ्ठ्या होळीत किती तरी झाडांची जळुन अक्षरश: राख होते. तीही एका क्षणात. झाडं मोठ्ठी व्हायला दहा वीस वर्ष लागतात आणि त्याची अशी एका क्षणात राख होणं चांगलं आहे का ? झाडं तोडू नक़ा. कुणाला तोडू देवू नका. जमलंच तर आयुष्यात एक तरी झाड लावा. मोठ्ठं करा आई बाबा तुम्हाला चालता येई पर्यँत तुमचं बोट धरून तुम्हाला आधार देतात तसं, झाडांमधे थोड़ं बळ येईपंर्यँत तुम्ही त्यांना. आधार दया. पुढं ती तुम्हाला आयुष्यभर आधार देतील. आपण त्यांच्यावर वर करतो तेव्हा ती कुठलीही तक्रार न करता ती जमीनदोस्त होतात. पण आपण झाडावरती नव्हे तर आपल्याच मुळांवरती घाव घालतो आहोत याची जाणीव आपल्याला कधीच होत नाहीं।
हे सारं पटतय ना तुम्हाला ऐवढं ऐकाल ना अक्कालरावाचं ?
ऐकाल म्हणताय चला तर मग एक गोड पापा द्या
पुन्हा भेटू या.
तुमचा
अक्कालराव
No comments:
Post a Comment