तुम्ही म्हणाल ,” हा काय नवीन प्रकार आहे ?”
तुम्हाला बालदिन, महिला दिन, असे काही दिवस
जागतिक स्तरावर साजरे केले जातात हे माहित
असेलच. तसाच -
चिमणी दिनही. २० मार्च
हा तो दिवस.
दोस्तांनो जगभर चिमण्यांची संख्या कमी होत आहे. पूर्वी,” एक घास चिउचा, एक घास काऊचा.” अस म्हणत आई आपल्या बाळाला घास भरवावची.
" चिमणीच घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं." ही गोष्ट तर आम्हाला तोंङपाठ होती. पण आता चिमणीला घरंट करायला जागाच उरली नाही तर ती घरंट कुठं बांधणार ?
" चिमणी चिमणी पाणी दे, कावळ्या कावळ्या खोपा दे." अस आम्ही पूर्वी वाळूचा खोपा करताना म्हणायचो. पण आता चिउताईला हाक कशी मारावी ? कारण ती आपल्या अवती भवती कुठेच दिसत नाही. अगदी परवाची गोष्ट सांगतो. आमच्या सोसायटित माझ्या एका मित्राने सोसायटितल्या रिकाम्या जमीनीत ज्वारी पेरली. हळू हळू हिरवे अंकुर वर आले. ज्वारिची धाट माझ्या खांद्याहुनही उंच झाली. त्यांना कणसं लागली. एक दिवस सकाळी सकाळी तिथं गेलो. पाहिलं तर त्या कणसांवर काही चिमण्या दाणे टिपत होत्या. पण त्या साऱ्या मिळून चौघीही नव्हत्या.
रानात राखन करताना हाळी दिली की शे – दोनशे चिमण्यांचा थवा भुर्रऽऽऽकन उडत जाताना मी पाहिला आहे. गेल्या कुठे येवढ्या चिमण्या ? आपण झाडं तोडली, पावसाचं प्रमाण कमी झालं.
पाखरांना घरट्याला जागा
आणि प्यायला पाणी मिळेनासं झालं.
मी मुळात खेडेगावातला. नगर जिल्हयात पिंपळगांवपिसा हे माझा गांव. तिथं आमची शेती आहे. मला आठवतंय, पूर्वी आमच्या घरात शंभर सव्वाशे पोती ज्वारी यायची, पण आता जिकडे पहावं तिकडे ऊस, गहू हीच पिकं. शेतकरी म्हणतात," ज्वारीला त्रास फार. शिवाय राखण करावी लागते ती वेगळीच. नाहीतर पाखरं दाणा टिकू देत नाहीत. "म्हणुन सरे ऊस करणार, गहू पेरणार. कारण मित्रांनो गव्हाच्या ओंबीवर छोटे छोटे कुसळ असतात. त्यामुळे चिमण्यांना त्या ओंबीतले दाणे खाता येत नाहीत. किती स्वार्थी नाही आपण ???????
आपल्या ह्या अशा अप्पलपोटी वागण्यामुळे चिमण्यांची संख्या दिवसें दिवस कमी होत चालली आहे. त्यांच संवर्धन कराव या हेतुने मनवाने वीस मार्च हा दिवस चिमनी दिन मानून साजरा
करायचा ठरवलंय.
पण मित्रांनो नुसता असा दिवस साजरा करून चिमण्यांची संख्या वाढणार नाही. त्यांची संख्या वाढायला हवी असेल तर आपल्याला झाडं लावली पाहिजेत. चिमण्यांना हवे असलेले दाणे सुध्दा
पेरले पाहिजेत.
"कुठे ?", म्हणून काय विचारता.
कुठेही!!!!!!
आपल्याला जागा मिळेल तिथे. अगदी आपल्या अंगणात सुध्दा. दाणे पेरले की, कणंस येतील. त्या कणंसावर चिमण्यां येउन बसतील. अगदी न सांगता. मग आपल्याला कधीही,
"या चिमण्यांनो परत फिरा घराकडे अपुल्या.’’
हे गाणं म्हणावं लागणार नाही.
" चिमणीच घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं." ही गोष्ट तर आम्हाला तोंङपाठ होती.
" चिमणी चिमणी पाणी दे, कावळ्या कावळ्या खोपा दे." अस आम्ही पूर्वी वाळूचा खोपा करताना म्हणायचो. पण आता चिउताईला हाक कशी मारावी ? कारण ती आपल्या अवती भवती कुठेच दिसत नाही.
रानात राखन करताना हाळी दिली की शे – दोनशे चिमण्यांचा थवा भुर्रऽऽऽकन उडत जाताना मी पाहिला आहे.
पाखरांना घरट्याला जागा
आणि प्यायला पाणी मिळेनासं झालं.
मी मुळात खेडेगावातला. नगर जिल्हयात पिंपळगांवपिसा हे माझा गांव. तिथं आमची शेती आहे.
आपल्या ह्या अशा अप्पलपोटी वागण्यामुळे चिमण्यांची संख्या दिवसें दिवस कमी होत चालली आहे. त्यांच संवर्धन कराव या हेतुने मनवाने वीस मार्च हा दिवस चिमनी दिन मानून साजरा
करायचा ठरवलंय.
पण मित्रांनो नुसता असा दिवस साजरा करून चिमण्यांची संख्या वाढणार नाही.
पेरले पाहिजेत.
"कुठे ?", म्हणून काय विचारता.
कुठेही!!!!!!
आपल्याला जागा मिळेल तिथे. अगदी आपल्या अंगणात सुध्दा. दाणे पेरले की, कणंस येतील. त्या कणंसावर चिमण्यां येउन बसतील. अगदी न सांगता. मग आपल्याला कधीही,
"या चिमण्यांनो परत फिरा घराकडे अपुल्या.’’
हे गाणं म्हणावं लागणार नाही.
No comments:
Post a Comment