Sunday, April 25, 2010

माझ्या मामाची रंगीत गाडी हो




राग गेलाय ना तुमचा ?
मग ठीक आहे.
मला माहिती आहे आता तुम्ही सारे कुठे कुठे गावाला गेला असाल. कुणी मामाकडे, कुणी आत्त्याकडे, कुणी आजोळी तर कुणी आणखी कुठे. खूप खूप मजा करत असाल तिथे. मामाचं शेत असेल तर मग आणखिनच मजा येत असेल. तिथे ओढ असेल, मोटा उरल्या नाहीत आता कुठे बटन दाबलकी पाणी फेकणारी मोटार असेल, विहरीच पाणी पिकापर्यंत वाहून नेणारा पाट असेल, त्या पाटात पंख बुडवून अंघोळ करणारी पाखरं असतील, दुपारच्या रणरणत्या उन्हात आंब्याची गार सावली असेल, गाई - गुरं, शेळ्या - मेंढ्या असतील. रात्रीच्या शुभ्र चांदण्यात वाड्याच्या अंधारात टाकलेला घोंगड असेल आणि त्या घोंगड्यावर आकाशातल्या चांदण्या मोजत लोळणारे तुम्ही असाल.
तुम्हाला ते गाणं आठवतंय -

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो,

कशी दौडत
दौडत येई हो
मला आजोळी घेवून जी हो

तुम्ही म्हणाल अक्कलराव हे काय चालवलय तुम्ही ? मोट काय ? पाट काय ? घोंगड काय ? अहो, आम्ही फक्त टि व्ही पाहतो, विडीओ गेम खेळतो, कॉम्पुटरवर एकेक गेम खेळताना तर फार मजा येते. तुम्हाला यातलं काही माहिती आहे का अक्कलराव ? काय गेम असतात एकेक. रेसिंग काय, फायटिंग काय फार फार धम्माल येते.
मुलांनो अशा बैठ्या आयुष्यात मजा वाटते तुम्हाला. अरे हे तर तुमचं खेळण्याचा, बागडण्याच, हुंदडण्याच , आकाशात पाखरांसारखी मुक्त भरारी घेण्याचा वय. तुम्ही असा एका जागी बसून चालेल. अरे तुम्ही तर उद्याचं स्वप्नं आहात. तुम्ही तर उद्याचं भविष्य आहात. तुम्ही असा एका जागी बसून नाही चालणार. तुम्ही खेळलं पाहिजे, फिरलं पाहिजे, खूप खूप वाचलं पाहिजे.
अर्थात यात तुमचं काही चुकत नाही म्हणा , यात चुकता आमचाच. मोठ्या माणसांचा. काय आहे कि आता आई बाबा दोघीही नौकरी करत असतात. मग कुणी कुणाकडे जायला आणि यायला वेळ आहे कुणाला. सारे आपले चार भिंतींचे गुलाम झालेले.

पण मी जातो हो मुलांना घेवून गावी. खुपदा नाही पण निदान वर्षातून एकदा तरी. तेव्हा आमच्या जयूरानीला ( खरा राजा हा ! ) पडलेले प्रश्न फार मजेशीर आहेत.
बाबा एवढा
ओझं घेवून चालताना बैलांच्या पायांना त्रास नाही का हो होत ?
होतो ना. - मी.
मग त्यांच्यासाठी कुणी बूट का शिवत नाही ?
मी निरुत्तर
आमची बैलगाडी वाड्याहून निघाली. मी खरा तर बैलांला कोणतीच दिशा देत नव्हतो पण तरीही आमची गाडी बरोबर आमच्या शेताकडेच चालली होती. याचाही आमच्या चिरनजीवांना आश्चर्य वाटत होता.
बाबा ते कसे काय बरोबर आपल्या शेताकडेच चालले आहेत.
अरे रस्ता पाठ झाला आहे त्यांला- मी
आपलं घर, आपलं शेत, आपली माणसं हि आपुलकीची भावना जनावरांच्या मनातही असते. पण आपण माणसं मात्र या भावनेला पारखे होत चाललो आहोत. यातून आपण बाहेर पडायलाच हवं.
आपल्यातल्या आपुलकीच नातं अधिक पक्कं करायला हवं.
मग चला तर टि व्ही समोरून उठा. निघा मामाच्या गावाला. आणि आल्या नंतर सांगा मला तिथ तुम्ही काय काय गमती जमती केल्या ते.


No comments: