Tuesday, April 27, 2010
अथक परिश्रम
मागे एकदा मंगेश तेंडूलकरांच्या विषयी मी लिहिलं होतं. तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं कि,"त्यांनी चित्रकलेचं कोणतही शिक्षण घेतलं नाही. तरी आज ते एक आघाडीचे व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जातात.
मला सुद्धा दोन महिन्यापूर्वी या ब्लॉग विषयी काहीच माहित नव्हतं. त्यातलं ओ कि ठो कळत नव्हतं. पण आज दोन महिन्यानंतर मला बर वाटेल असं काम झालय.
दोन महिन्यापासून तुम्हाला रुचेल असं लिहीयचा मनापासून प्रयत्न करतोय. पण माझ्या ब्लॉगचं पान मात्र मला देखणं वाटत नव्ह्तं.
बाळ दिसायला छान असलं कि त्याच्याकडे पहावसं वाटत. त्याच्याशी खूप खूप खेळावस वाटतं. पण त्याच्या नाकाला खूप शेंबूड असेल तर त्याची पापी काही घ्यावीशी वाटत नाही. तसंच माझ्या ब्लॉगचं पान कालपर्यंत काहीसं शेंबड होतं.
म्हणून शनिवारची एक मेची आणि आठवड्याची आजची अशा जोडून आलेल्या दोन्ही सुट्ट्या तुम्ही नेहमी पाहणार असलेलं हे पान देखणं करण्यात घालवल्या. आणि आज संध्याकाळी मना सारख काम झालं तेव्हा सुटकेचा श्वास घेतला.
हे सारं तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच मुलांनो कि," अथक परिश्रामाशिवाय काहीच शक्य नसता आणि अथक परिश्रम केले तर काहीच अशक्य नसतं ” हे तुम्हाला कळावं.
मग कराल ना अथक परिश्रम ?
छे ! मी प्रश्न कसला विचारतोय. मला माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा खूप खूप कष्टाळू आहात ते.
हो आणि तुमचा रिझल्ट लागेलच ना एक - दोन दिवसात. त्यासाठी भेटेनच मी तुम्हाला एक दोन दिवसात.
पेढे घेवून या हं.
एक सांगायलाच हवं. आपल्या ब्लॉगच्या एक जाहिरात आहे. ती आहे जगभरातल्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठीकाम करणाऱ्या एका संस्थेची. तुमच्या खाऊतले थोडे थोडे पैसे साठवा आणि शक्य झालं तर त्या संस्थेला नक्कीमदत करा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment