आवडली कि नाही ?
खूप खूप आवडली.
बहोत अच्छे !
हो पण तुमच्या निकालाचा काय ? निकाल लागले असतिल ना आता सगळ्यांचे ?
सॉरी ! आपण ' निकाल लागला असेल ' या ऐवजी ' रिझल्ट लागला असेल ' असा म्हणू या. कारण ' निकाल लागणे ' हं शब्दप्रयोग ' वाईट होणं ' या अर्थाने हि वापरला जातो. म्हणून आपण 'रिझल्ट लागला ' असेल असंच म्हणू या.
हं ! मग लागलेत ना सगळ्यांचे रिझल्ट. कुणाकुणाला किती टक्के मार्क मिळाले.
८० टक्के, ९० टक्के, ९७ टक्के, ९१ टक्के, ९४ टक्के ................ बापरे ! एवढे टक्के ? कमाल आहे तुमची.
काय ? ढमप्याला फक्त ५० टक्केच मार्क मिळाले. आणि म्हणून तो रडतोय.
ढमप्या हे बघ असं रडायचं नाही. सगळे लक्ष देवून ऐका. हे पहा मुलांनो मार्क चांगले पडायला हवेत हे खरं. त्यासाठी खूप अभ्यास करायला हवा हे हि खरं. पण अगदीच पुस्तकी किडा व्हायला नको काही. अभ्यासाचा आनंद घेता आला पाहिजे.
आणि ढमप्या तुला मार्क कमी पडले म्हणून तू काही लगेच परवाच्या गोष्टीतल्या कोकिळे सारखं रडत बसायला नको काही. मार्क आणि बुद्धिमत्ता यांचा एकमेकांशी संबंध आहे हे जरी खरं असलं तरी, कमी मार्क म्हणजे ढ गोळा असं नव्हे काही. तू गेल्यावर्षी खूप खेळला असशील. हो कि नाही ?
मग ! असं नाही करायचं. आता दोन महिने खूप खेळ. पण एकदा शाळा सुरु झाली कि मग रोज फक्त अर्धाच तास खेळायचं. आणि खेळून आलं कि मन लावून अभ्यास करायचा. हो हो रविवारी खेळायचं थोडं जास्त. मग बघ तूच मला पुढच्या वर्षी सांगशील ," अक्कलराव मलासुद्धा ८० टक्के मार्क मिळाले. "
ऐकशील ना माझं ? ओ. के. ! पळ तर मग खेळायला. मस्त मजा कर.
No comments:
Post a Comment